-
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे. श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत एक उत्तम अभेनेत्री म्हणून ओळख निर्माण केलीय. अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत श्रद्धाने रसिकांच्या मनावर राज्य केलंय. बॉलिवूडचे व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धाने बॉलिवूडमध्ये गेल्या 11 वर्षात अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत आणि स्वत:च स्थान निर्माण केलंय.
-
2010 सालात आलेल्या 'तीन पत्ती' सिनेमातून श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बिग बी अमिताभ बच्चन आणि आर माधवन या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. यानंतर 'लव्ह का द एण्ड' हा सिनेमा तिने केला.
-
श्रद्धाला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 2013 सालात आलेल्या 'आशिकी-2' या सिनेमाने. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. सिनेमातील आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धाच्या जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. तर या सिनेमातील गाण्यांनी सगळ्यांनाचा वेड लावलं.
-
या सिनेमानंतर श्रद्धा आणि आदित्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र श्रद्धाने आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.
-
यानंतर २०१४ मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक विलन’ या सिनेमात तिने सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुखसोबत काम केले होते. हा सिनेमाही सुपरहिट झाला होता.
-
'आशिकी-2', 'एक व्हिलन' या सिनेमांनतर श्रद्धाला अनेक मोठया सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. यानंतर तिने 'हैदर', 'रॉक ऑन' 'बागी', 'एबीसीडी-2', 'स्त्री' अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.तर साउथ स्टार प्रभाससोबतही श्रद्धा कपूर 'साहो' य़ा सिनेमातून झळकली आहे.
-
२०१५ मध्ये वरुण धवनसोबत आलेला ‘एबीसीडी २’ या सिनेमात तिने तिच्या नृत्याची झलक दाखवली. या सिनेमातले श्रद्धाचे नृत्य पाहून तिने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
-
श्रद्धाचा जन्म ३ मार्च १९८७ मध्ये मुंबईत झालेला. अभिनेते शक्ति कपूर आणि शिवांगी कपूर यांची ती मुलगी आहे. श्रद्धाची मावशी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यादेखील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.
-
श्रद्धा कपूर आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी एकाच शाळेतून त्यांच शिक्षण पूर्ण केलंय. यानंतर दोघांनी एकत्र सिनेमादेखील केला. तर शालेय दिवसांमध्ये टायगरला श्रद्धावर क्रश असल्याचं त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हंटलं होतं.
-

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा