-
शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. मात्र बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी अनेक अभिनेत्यांना टक्कर देत आपलं स्थान निर्माण केलंय. या अभिनेत्रींनी इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये खान आणि कपूर मंडळींनाही मागे टाकलं आहे. कोण आहेत या अभिनेत्री? चला जाणून घेऊया…
-
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. प्रियांकाचा 'द व्हाइट टायगर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. इन्स्टाग्रामवर प्रियांकाचे ६०.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. भारतीय सेलिब्रिटींमध्ये प्रियांकाचे सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. प्रियांकाच्या आधी फक्त भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटचे १०० मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे पण लाखो चाहते आहेत. श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर ५८. ३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
बॉलिवूडची मस्तानी म्हणून दीपिका ओळखली जाते. दीपिकाचे इन्स्टाग्रामवर ५३.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड तिच्या हळव्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. नेहाचे ५२.३ मिलियन इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.
-
गली बॉय' आणि 'राझी' अशा चित्रपटांतून सगळ्यांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलियाचे इन्स्टाग्रामवर ५१. १ मिलियन फॉलोअर्स आहेत. आलियानंतर सगळ्यात जास्त फॉलोअर्स कोणत्या अभिनेत्याचे असतील तर तो अक्षय कुमार आहे. अक्षयचे ४८.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली…