-
मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. नेहाने शार्दुल सिंह बयासशी लग्नगाठ बांधली. (छायाचित्र सौजन्य – नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. पण सध्या एका वेगळ्यात कारणामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे. ते कारण म्हणजे तिने इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
-
'She said that she always wanted to be a poet, But I can tell deep down, All she really wanted was to be in somebody’s poem.' असे कॅप्शन देत नेहाने हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील नेहाच्या बोल्ड व हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.
-
नेहाने १९९५ साली ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तिने मराठीसोबतच तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं. ‘दिवाने’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘देवदास’ या हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली. ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘बिग बॉस १२’ या कार्यक्रमांमुळे ती प्रकाशझोतात आली.
-
नेहा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते. शार्दुलसोबत तिच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना नेहाने सडेतोड उत्तर दिलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नापूर्वी शार्दुलसोबत लिव्ह-इनमध्ये राहिल्याचाही खुलासा केला.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”