-
पिंजरा या मालिकेतून नावारुपाला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. (सर्व फोटो सौजन्य – संस्कृती बालगुडे / इंस्टाग्राम)
-
निखळ हास्य आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर संस्कृतीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.
-
संस्कृती सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
अभिनयाची आवड असणाऱ्या संस्कृतीला फोटो काढण्याचीही तितकीच आवड आहे.
-
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये संस्कृतीने फिकट सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे.
-
या लूकमध्ये संस्कृती अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर संस्कृतीच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे.
-
संस्कृती अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे.
-
संस्कृतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर आणि आत्मविश्वासू दिसून येत आहे.
-
छोट्या पडद्यावर वावर असणाऱ्या या अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
'सांगतो ऐकना', 'शॉर्टकट', 'निवडूंग', ‘एफयू – फ्रेंडशिप अनलिमिटेड’, 'टेक केअर गूड नाईट', 'भय' आणि 'सर्व लाईन व्यस्त' यांसारख्या अनेक चित्रपटांतून संस्कृतीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा