-
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने आजवर प्रत्येक श्रोत्याला मंत्रमुग्ध केलंय. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत त्यांनी अनेक गाणी अजरामर केली आहेत.
-
लता दीदी सोशल मीडियावर अनेकदा जुने फोटो शेअर करत भूतकाळातील आठवणींना उजाळा देत असतात. लता दीदींनी नुकताच त्यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो खूप खास असल्याचं सांगत त्यांनी या फोटोशी जोडलेली आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
-
लता दीदींनी शेअर केलेला फोटो हा त्यांच्या पहिल्या क्लासिकल परफॉर्मन्सच्यावेळेचा आहे. 9 सप्टेंबर 1938 साली सोलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी हा फोटो काढला गेला होता. असं लता दीदींनी कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.या फोटोत लता ददींनी दोन वेण्या बांधल्याचं दिसतंय.
-
हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हंटलंय. "आज आमचे परिचीत उपेंद्र चिंचोरे यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचा पहिला क्लासिकल परफॉर्मन्स नऊ सप्टेंबर 1983 मध्ये सोलापूरमध्ये सादर केला होता. तेव्हा प्रसिद्धीसाठी हा फोटो काढण्यात आला होता."
-
पुढे दीदी म्हणाल्या "विश्वास होत नाहीय कि 83 वर्ष झाली गाणं गातेय."
-
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून लता दीदींनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”