-
आई, अम्मी,माँ, मम्मी या सगळ्या शब्दात सामावलेल्या त्या जननीला, त्या जन्मदात्रीला आज जगभरातून वंदन केलं जातं आहे. मदर्स डेच्या निमित्ताने अनेकजण आपल्या आईला आणि आईसमान त्या सर्व मातांना वंदन करून त्यांचे आभार मानत आहेत. मराठी कलाकारांनी देखील आपल्या आईसोबतचे खास फोटो शेअर करत. आईला मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
-
अभिनेत्री नेहा पेंडसेने आईसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. "तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही." अशा आशयाचं कॅप्शन नेहाने या फोटोला दिलंय. (photo-instagram@nehhapendse)
-
तर सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनेदेखील आईसोबतच फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (photo-instagram@iamrinkurajguru)
-
अभिनेत्री वैदही परशुरामीनेदेखील आई आणि तिचा एक गोड फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत सर्व महिलांना तिने मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(photo-instagram@parashuramivaidehi)
-
अभिनेत्री श्रीया पिळगावकरने देखील आईचा म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणाली, "मला माहितेय तू म्हणशील प्रत्येक दिवस हा मदर्स डे असतो. पण मी तुझ्यासोबत सेलिब्रेशन करण्याची प्रत्येक संधी शोधते. माझी बहिण, माझी सक्रेट कीपर, खोडकर मुलगी आणि माझी सुंदर लक्ष्मी" असं म्हणत श्रीयाने आईला शुभेच्छा दिल्या आहेत. .(photo-instagram@shriya.pilgaonkar)
-
"अशीच पाठीशी उभी राहा. आई." असं कॅप्शन देत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आईला मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या..(photo-instagram@sidchandekar)
-
तर सिद्धार्थची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरने देखील आईसोबतचा खास क्षण शेअर केला आहे. तिने फक्त आईचाच नव्हे तर सासूबाईंचा फोटो शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या…(photo-instagram@ mitalimayekar)
-
स्मिता गोंदकर आणि तिची आई. (photo-instagram@smitagondkar)
-
सगळ्यांचा लाडका बाळू मामा म्हणजेच अभिनेचा सुमित पुसावळेने देखील आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तो म्हणाला, "आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य असेच राहू दे आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे..मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" …(photo-instagram@sumeet_pusavale)
-
अभिनेत्री गिरजा प्रभू आणि तिची आई…(photo-instagram@girijaprabhu_official)
-
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील ओम म्हणजेच शाल्वची रिअर लाईफ आई.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’