-
आपल्या अभिनय कौशल्याने अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे परिणिती चोप्रा.
-
परिणितीने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
पण तिच्या चित्रपटातील भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये परिणितीने चित्रपटामध्ये इंटिमेट सीन देण्याविषयी खुलासा केला होता.
-
परिणितीने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती तिच्या प्रत्येक भूमिका योग्य पद्धतीने साकारते आणि कधीही त्या भूमिकांचा परिणाम तिच्यावर होऊ देत नाही असे तिने सांगितले आहे.
-
त्यानंतर परिणितीला 'चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन देताना तू त्यात कधी वाहून गेलीस का?' असा प्रश्न विचारण्यात आला.
-
त्यावर परिणीती तिचा अनुभव सांगत म्हणाली, 'नाही, मी अनेक वेळा इंटिमेट सीन दिले आहेत. ज्यामध्ये किसिंग आणि लव्हमेकिंग दाखवण्यात आले होते. पण किसिंग, लव्हमेकिंग सीन दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर तिथेच थांबवले जातात.'
-
पुढे ती म्हणाली, 'तुम्ही जेव्हा एखादा इंटिमेट सीन देता तेव्हा त्यात तांत्रिकदृष्ट्या विचार करून ते शूट केले जातात.'
-
परिणितीने करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि तिला यश देखील मिळाले.
-
पण त्यानंतर ती चित्रपटांपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले.
-
त्यामागे चांगल्या चित्रपटांची ऑफर येत नसल्याचे तिने कारण सांगितले होते.
-
काही दिवसांपूर्वीच 'द गर्ल ऑन द ट्रेन', 'सायना' आणि 'संदीप और पिंकी फरार' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
-
आता ती लवकरच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात दिसणार आहे.
-
(All Photos : parineeti chopra instagram)

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”