-
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' लतिका वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळणार आहे.
-
अभिमन्यू आणि लतिकाचं लग्न हे फक्त काही अटींवर त्यांनी केलं असलं तरी लतिकाने अभिमन्यूसाठी वटपौर्णिमा साजरी केलीय.
-
खास नऊवारी साडी परिधान करून लतिकाने वडाची पूजा केली. यात तिला अभिमन्यूचीदेखील साथ मिळाल्याचं दिसतंय.
-
बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती नाही. अभिमन्यु आणि लतिकाने हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवले. आता मात्र लतिका निर्णयावर पोहचली आहे की ती अजून त्यांच्या नात्याबद्दल अजून लपवू शकणार नाही आणि सगळ्यांना सांगणार
-
कामिनीला मात्र हे सत्य माहिती आहे आणि ती वटपौर्णिमेच्या दिवशी लतिका आणि अभिच्या घरच्यांसमोर ही गोष्ट उघडकीस आणणार आहे, की यांचे लग्न खोट आहे.
-
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये लतिका आणि अभीच्या लग्नाचे सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. यानंतर दोघांचे नाते कुठलं नवं वळण घेणार ? लतिका आणि अभी कसे या घटनेला सामोरे जाणार ? घरच्यांना कसे सांभाळणार ?याची रंजक कथा येत्या आवड्यात पाहायला मिळेल.

“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य