-
मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे.
-
सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
-
या प्रकरणार अभिनेत्री कंगना रणौत, पूनम पांडे, गहना वशिष्ठ आणि इतर काही बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या.
-
आता यूट्यूबर पुनीत कौरने सोशल मीडियाद्वारे तिला देखील राजने पॉर्नव्हिडीओमध्ये काम करण्यासाठी मेसेज केल्याचे सांगितले आहे.
-
पुनीतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला काही पोस्ट केल्या आहेत.
-
राज कुंद्राने 'हॉटशॉट्स' या अश्लील अॅपसाठी पुनीतला काम करण्यासाठी मेसेज केल्याचा खुलासा तिने केला आहे.
-
'मला विश्वास बसत नाही की हा व्यक्ती इतका खालच्या थराला जाऊ शकतो. त्याच्या अॅपसाठी त्याने मला मेसेज केला होता. मला वाटलं तो स्पॅम मेसेज होता. या माणसाला चांगली शिक्षा झाली पाहिजे' असे पुनीतने पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
पुनीत ही अतिशय लोकप्रिय युट्यूबर आहे.
-
तिचे लाखो सब्सक्रायबर आहेत.
-
सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.
-
राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली.
-
अटकेपूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून राज कुंद्राची सात ते आठ तास चौकशी करण्यात आली.
-
राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशीब बदलणार! संपत्तीत प्रचंड वाढ, अचानक धनलाभ तर कमाई होईल खूप चांगली