-
'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना अखेरयश मिळाले .
-
मालिकेमध्ये रणजीतच्या मदतीने संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे. पण आता 'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेत.
-
पुन्हाएकदा राजा रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही. संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे. आणि याचसाठी राजा रानी कूल लुकमध्ये दिसणार आहेत.
-
खास डेटसाठीची संजूने जय्यत तयारी देखील केली आहे. संजीवनी बुलेट चालवणार आहे.
-
यावेळी रणजीत आणि संजिवनी नदीकाठी निवांत वेळ घालवतना दिसणार आहेत.
-
यावेळी संजिवनीने जीन्स आणि शर्ट परिधान केलंय. तर कायम बाधलेले केस तिने मोकळे सोडले आहेत.
-
तर रणजीतचा देखील जीन्स आणि डेनिम शर्टमध्ये डॅशिंग अंजाद पाहायला मिळतोय.
-
या फोटोंमध्ये संजू आणि रणजितचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतोय.
-
अनेक दिवसांनी संजू आणि रणजीतच्या नशीबी हे आनंदाचे क्षण आले आहेत.
-
ही राजा रानीची डेट नक्कीच खास असेल. रणजीतसाठी अजून काय काय सरप्राईझ असणार आहे हे येत्या भागात कळेल. (Photo-PR)

भारतात सापडली हडप्पाहून प्राचीन, ९००० हजार वर्षे जुनी संस्कृती जगाचा इतिहास बदलणार का?