-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून थलापथी विजय ओळला जातो. विजयने त्याच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साउथमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात विजयचे चाहते आहेत.
-
तर भारताचा माजी क्रिकेटर आणि चेन्नईचा आवडता खेळाडू असलेल्या महेंद्रसिंह धोनीचे देशभरात चाहते आहेत.
-
या दोनही सुपरस्टार्सला एकत्र पहाण्याची संधी चेन्नईमधील चाहत्यांना नुकतीच मिळाली.
-
महेंद्रसिंह धोनी आणि विजयच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंना धोनी आणि विजयच्या चाहत्य़ांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.
-
चेन्नईमधील गोकुळम स्टुडिओमध्ये धोनी एका जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी पोहचला होता.
-
याच स्टुडिओत त्याचवेळी योगायोगाने अभिनेता विजय त्यात्या 'बीस्ट' या सिनेमाचं शूटिंग करत होता.
-
यावेळी धोनी आणि विजयने व्हॅनिटी व्हॅनमध्ये भेट घेतली आणि काही वेळ गप्पा मारल्या.
-
त्यानंतर दोघही एकत्रित आपापल्या शूटिंगसाठी बाहेर निघाले. यावेळी फोटोग्राफर्सनी धोनी आणि विजयला गाठलं.
-
धोनी आणि विजय दोघांचे देखील अनेक चाहते असल्याने त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. धोनी आणि विजयचे फोटो व्हायरल होत असून अनेकांनी या फोटोंना पसंती दिलीय. (Photo-Instagram/Twitter)

Sara Tendulkar: सारा तेंडुलकरचं ब्रेकअप, बॉलीवूड अभिनेत्याबरोबर नातं फुलण्याआधीच संपलं? कुटुंबाच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय