-
बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही तिच्या खाजगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत आलीय. पुन्हा एकदा तिने अमेरिकी बॉयफ्रेंडसोबत रोमॅण्टिक फोटोज शेअर केल्यामुळे चर्चेत आलीय.
-
या फोटोंमध्ये आलिया बॉयफ्रेंड शेन ग्रीगोइरेसोबत बरीच इंटीमेट होताना दिसून आली. काही फोटोजमध्ये शेन आलियाला लिप लॉक करताना दिसून आला
-
तर काही फोटोजमध्ये त्याने आलियाला उचलून घेतलंय. आलियाने शेअर केलेले हे बॉयफ्रेंडसोबतचे फोटोज खूपच बोल्ड आणि रोमॅण्टिक आहेत.
-
आलिया सध्या अमेरिकेत असते. तर तिचा बॉयफ्रेंड देखील तेथीलच आहे.
-
शेन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलियाने तिचे हे खाजगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नुकतंच आलियाचा बॉयफ्रेंड शेन याने २४ ऑगस्ट रोजी आपला २२ वा वाढदिवस साजरा केला. आलिया कश्यपने आपल्या खास अंदाज आपल्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
आलियाने शेअर केलेले फोटोज जितके रोमॅण्टिक आहेत, तितकीच रोमॅण्टिक त्यासोबतची कॅप्शन सुद्धा आहे. "माझ्या प्रेमाला 22 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…. ज्याने मला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी ठरवलं…तू मला भेटलास हे मी माझं नशीब समजते….मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहील.", असं लिहित तिने हे फोटोज शेअर केले आहेत.
-
या दोघांचा हा फोटो लगुना बीचवरचा आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवण्यासाठी लगुना बीचवर गेले होते. या बीचवरून एक व्हिडीओ देखील आलियाने शेअर केला होता.
-
गेल्या एक वर्षापासून आलिया शेनला डेट करतेय. या फोटोंमध्ये दोघांची स्ट्रॉंग बॉण्डिंग दिसून येतेय.
-
आलिया शेनला एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटली होती. आलिया तिच्या आधीच्या ब्रेकअपमुळे मनाने खूपच तुटून गेली होती. यातून बाहेर पडण्यासाठी तिने डेटिंग अॅपची मदत घेतली आणि त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
आलियाने एकदा म्हटलं होतं की, शेनने तिला भेटण्यासाठी देखील बोलावलं होतं. पण त्यावेळी ती त्याला टाळत होती. पण त्यानंतर जेव्हा तिची मैत्रीण सुहाना खानने तिला समजावलं त्यावेळी ती एक पाऊल पुढे टाकण्यासाठी तयार झाली.
-
आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा आणखी एक फोटो शेअर केलाय. यात शेन त्याच्या डॉगीसोबत खेळताना दिसून येतोय.
-
आलियाचा बॉयफ्रेंड शेन यांचं अनुराग कश्यपच्या घरी येणं-जाणं सुद्धा होत असतं. आलिया यापूर्वी अनेकदा याबाबत तिच्या युट्यूब चॅनलवर बोलताना दिसून आली आहे.
-
आलिया तिच्या खाजगी आयुष्याबाबत बिनधास्तपणे गप्पा मारत असते. तिच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी ती फक्त वडील अनुराग कश्यपसोबतच नव्हे तर पब्लिक प्लॅटफॉर्मवरसुद्धा तितक्याच बिनधास्तपणे व्यक्त होत असते.
-
आलियाने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. तिचे फॅन्स या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. सोबतच तिच्या या फोटोवर कमेंट्स करत फॅन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (ALL Photos: Instagram/aaliyahkashyap)
-

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’