-
छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते.
-
जेठालालला बबीताजीबद्दल वाटणारं आकर्षण तर सर्वांनाच माहिती आहे.
-
मात्र आता खऱ्या आयुष्यात मुनमुन दत्ता ही मालिकेत जेठालालचा मुलगा टप्पू अर्थात राज अनादकटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
-
राज आणि मुनमुनमध्ये ९ वर्षांचं अंतर असून हे दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.
-
सोशल मीडिया पोस्टवर राजच्या कमेंट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
-
एका वृत्त वाहिनीला सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता…’च्या संपूर्ण टीमला या दोघां विषयी माहित आहे. एवढंच नाही तर त्या दोघांच्या कुटुंबाला देखील या विषयी माहित आहे.
-
बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच राज अनादकत यांच्या रिलेशलशिपच्या चर्चांनंतर सोशल मीडियावर जेठालाल ट्रेंडमध्ये आला आहे.
-
शोमध्ये बबीताजीच्या प्रेमात असलेल्या जेठालालचा त्याच्या मुलालचं म्हणजेच टप्पूचं बबीतासोबत नातं असल्याचं लक्षात आल्याने आता जेठालालची अवस्था कशी असेल हे वर्णन करणारे धमाल मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होवू लागले आहेत.
-
या मीम्समुळे जरी मुनमुन दत्ता आणि राज हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असले तरे ट्रेंडमध्ये मात्र जेठालाल आहे.
-
जेठालालला आता अक्षू अनावर झाले असतील हे या मीममध्ये दाखवण्यात आलंय.
-
तर टप्पूच्या वागण्याने जेठालालवर आत्महत्या करण्याची वेळ आलीय असं यात दाखवण्यात आलंय.
-
‘वडीलांच्या नजरेत मी आणखी खाल पडलो’
-
तर या मीममध्ये युजर म्हणालाय, “यासाठीच चंपकलाल म्हणजेच जेठालालच्या वड़िलांनी ९ वर्षांपूर्वीत टप्पूचं लग्न करण्याचा घाट घातला होता.”
-
टप्पू आणि बबीताच्या लग्नासाठी जेठालाल सेलिंडर नेत असल्याचं हे मेजशीर मीम
-
बबीताबद्ल जेठालालला सत्य कळाल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन
-
तर टप्पूच्या या रिलेशनशिपमुळे सोनूवर अन्याय झाला असून अनेक युजर ‘सोनूला न्याय द्या’ म्हणत आहेत.
-
तर तारक जेठालालची समजूत घालताना.
-
मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच राज अनादकतच्या रिलेशनशिपबद्दल कळाल्यानंतर जेठालालची अवस्था.
-
सोशल मीडियावर वेगवेगळ्या मीम्समुळे जेठालाल ट्रेंडमध्ये आहे.
-
जेठालालला या बातमीमुळे मोठा शॉक बसला असेल असं म्हटलं जात आहे.
-
या चर्चांनंतर जेठालालवर आत्महत्येची वेळ आलीय असे विनोद केले जात आहेत.
-
टप्पू बबीताच्या प्रेमात पडल्याने सगळ्यात जास्त आनंद सोनूच्या वडिलांना म्हणजेच भिडे गुरुजींना झाला असेल असं नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे.
-
आणखी एक धमाल मीम
-
जेठालालसमोर जेव्हा टप्पू बबीताजीला घेऊन जातो तेव्हा जेठालालची झालेली अवस्था या धमाल मीममध्ये पाहायला मिळतेय.
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…