बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू दसानी हा त्याच्या फिटनेससाठी चर्चेत असतो. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळविलेली अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा म्हणून त्याला विशेष ओळखले जाते. अभिमन्यू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तो नेहमी त्याचे विविध फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. -
नुकतंच अभिमन्यूने इन्स्टाग्रामवर त्याच्या फिटनेसचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात अभिमन्यूची जबरदस्त बॉडी, बायसेप्स, अॅब्स पाहायला मिळत आहे.
अभिमन्यूचा हा फोटो तुफान व्हायरल झाला असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. -
अभिमन्यूने या फोटो पोस्ट करतेवेळी ‘मी आत येऊ शकतो का?’ असा प्रश्न विचारत रणवीर सिंगला टॅग केले आहे.
-
त्यावर रणवीरनेही भन्नाट कमेंट करत त्याला उत्तर दिले आहे. “खतम” अशी कमेंट रणवीरने त्याच्या पोस्टवर केली आहे.
त्याच्या कमेंटवर रिप्लाय करताना अभिमन्यू म्हणाला, फक्त चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी कमेंट त्याने केली आहे. दरम्यान बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग यानेही नुकतंच जबरदस्त फिटनेसचा एक फोटो शेअर केला होता. -
यात त्याची जबरदस्त बॉडी, बायसेप्स, सिक्स अॅब्स दिसत आहे.
रणवीरच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी तुफान कमेंट्स केल्या होत्या. ‘मर्द को दर्द नही होता’ या अॅक्शन कॉमेडी चित्रपटातून अभिमन्यूने सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिमन्यूने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत राधिका मदान ही सुद्धा यामध्ये झळकली होती. -
(सर्व फोटो – अभिमन्यू/ इन्स्टाग्राम)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…