-
शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर आज न्यायालय निर्णय देण्यात आला आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. कॉर्डेलिया क्रूझ येथे छापा टाकल्यानंतर त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता.
-
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले आहेत.
-
आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. आजही एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनच्या अशा काही चॅट सादर केले आहेत, जे ड्रग्ज विषयी होते. दरम्यान, या प्रकरणात अटक असलेली मुनमुन धमेचा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
अरबाज आणि मुनमुन यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.
-
प्रत्येकजण आर्यन खानला ओळखतो पण मुनमुन धमेचा कोण आहे? हे जाणून घेऊया.
-
सांगितले जात होते की मुनमुन धमेचा दिल्लीची रहिवासी आहे. मुनमुन धामेचा यांचे घर मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील तहसीलीमध्ये देखील आहे. मात्र सध्या त्या घरात कोणी राहत नाही.
-
२३ वर्षीय मुनमुन धमेचा फॅशन मॉडेल आहे. मुनमुन ही मध्य प्रदेशातील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे.
-
मुनमुनच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले होते. तर तिने यापूर्वी तिचे वडील अमित कुमार धामेचा यांना गमावले होते. तिचा एक भाऊ आहे, प्रिन्स धमेचा, जो दिल्लीत काम करतो.
-
मुनमुने शालेय शिक्षण सागर येथे पूर्ण केले. सागरमधील बऱ्याच लोकांना मुनमुनबद्दल माहिती नाही. नंतर, ती सहा वर्षांपूर्वी तिच्या भावासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी काही काळ भोपाळमध्ये राहिली.
-
मुनमुन धमेचा एक फॅशन मॉडेल आहे. कदाचित मॉडेलिंगद्वारेच ती मोठ्या सेलिब्रिटींच्या संपर्कात आली असेल.
-
सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींसोबत मुनमुनचे फोटो आहेत.
-
मुनमुन तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय आहे.
-
तिने तिच्या अकाऊंटवर तिच्या मॉडेलिंग फोटोशूटची अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत.
-
मुनमुनने सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तिचे फोटो शेअर केले आहेत.
-
यामध्ये अर्जुन रामपाल, वरुण धवन, सुयश राय, निखिल चिनप्पा, गुरू रंधावा या सेलिब्रिटींचा समावेश आहे. (all photo munmundhamecha instagram)
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा