-
सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो व्हायरल होतं असतात. सध्या अशाच एका सेलिब्रीटीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
या चिमुलक्या मुलीला पाहून ही नेमकी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पड़ला असेल.
-
या चिमुकल्या मुलीचा सध्याचा अंदाज चांगलाच बदललेला आहे. छोट्य़ा पडद्यावरील लोकप्रिय शोमधून ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय.
-
जर अजूनही अनेकांच्या लक्षात आलं नसेल तर कपिल शर्माच्या शोमधून या मुलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे असं सांगितलं तर कदाचित तुम्हाला अंदाज येईल.
-
या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हास्य आजही तसंच आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कुणीही नसून ‘द कपिल शर्मा’ शो मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती आहे.
-
सुमोनाने काहीदिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होत्. यात तिने बालपणीचा एक सुंदर फोटो देखील शेअर केला होता.
-
बालपणीच्या या फोटोत सुमोना खळखळून हसताना दिसतेय.
-
पुढे सुमोनाने तिचे आत्ताचे काही फोटो शेअर केले होते.
-
या फोटोतही सुमोनाच्या चेहऱ्यावर बालपणीसारखंचं हास्य झळकत आहे.
-
. ‘लहानपणीपासूनच मोठ्याने हसते’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं.
-
सुमोनाने ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेत राम कपूरसोबत त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
-
मात्र कपिल शर्मा शोमुळे सुमोनाला मोठी पसंती मिळाली.
-
या शोमध्ये तिने कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
सुमोना सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते
-
अनेकदा बोल्ड फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते.

“आता काय जीवच घेणार का?” महिलेला अंड्यात सापडलं पाहा; VIDEO पाहून यापुढे अंडी खाताना शंभर वेळा विचार कराल