-
क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता. (Photos: ANI/PTI)
-
करोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला.
-
यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं.
-
२ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.
-
शाहरुख खान येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती. मात्र अचानक सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला.
-
शाहरुख खान नेहमीप्रमाणे आलिशान कारमध्ये न येता साध्या कारने पोहोचला होता. तसंच यावेळी त्याच्यासोबत फक्त सुरक्षारक्षक होती. पत्नी गौरी किंवा मुलगी सोबत नव्हती.
-
यानंतर नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला.
-
शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला.
-
यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.
-
न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारताना आर्यनच्या व्हॉट्सअॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात