-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटामुळे राणी मुखर्जी ही चांगलीच चर्चेत आहे.
-
राणी मुखर्जीने आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
पण एकदा यश चोप्रा यांनी राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना काही कारणामुळे एका खोलीत कैद करुन ठेवले होते. यामुळे ती त्यांच्यावर फारच वैतागली होती.
-
नुकतंच ‘न्यूज १८’ ला दिलेल्या मुलाखतीत तिने हा संपूर्ण किस्सा सांगितला आहे.
-
‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटानंतर ती सतत चित्रपट नाकारत होती. ती कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्विकारत नव्हती.
-
त्यादरम्यान ती जवळपास ८ महिने काम न करता घरी बसलेली होती.
-
विशेष म्हणजे यावेळी समीक्षक आणि पत्रकारांनी तिच्याबद्दल लिहिणे देखील बंद केले होते.
-
राणी मुखर्जीची कारकीर्द संपली असे देखील अनेकांना वाटू लागले होते.
-
पण राणीने ठरवले होते की, तिला अशा एखादा चित्रपट करायचा होता जो तिच्या मनाला भिडेल.
-
यादरम्यान राणीला ‘साथिया’ या चित्रपटाची ऑफर आली होती.
-
यावेळी राणीचे आई-वडील यश चोप्रांना भेटायला गेले होते.
-
राणी कोणतेही चित्रपट करणार नाही, हे सांगण्यासाठी ते यश चोप्रांना भेटायला गेले होते.
-
यादरम्यान यश चोप्रांनी राणीला फोन केला. त्यावेळी ते तिला खूप ओरडले.
-
“तू मोठी चूक करत आहेस”, असेही त्यांनी तिला सांगितले.
-
त्यावेळी यश चोप्रांनी राणीला सांगितले की, “मी तुझ्या आई-वडिलांना ते ज्या खोलीत आहेत, त्याच खोलीत त्यांना बंद करणार आहे आणि जोपर्यंत राणी एखादा चित्रपट करण्यास होकार देत नाही, तोपर्यंत मी ती खोली उघडणार नाही,” अशी धमकी त्यांना दिली होती.
-
यश चोप्रा यांच्या या अटीनंतर राणीने ‘साथिया’ चित्रपटासाठी होकार दिला.
-
‘साथिया’ हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विवेक ऑबेरॉयने स्क्रीन शेअर केली होती.
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल