-
बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि गौरी खानची लव्हस्टोरी शाळेच्या दिवसांमध्येच सुरु झाली होती. पण याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कॉलेजदरम्यान झाली होती. (Photos: Social Media)
-
गौरी हिंदू तर शाहरुख मुस्लिम कुटुंबातून होता.
-
शाहरुख आणि गौरी जेव्हा एकमेकांशी लग्न करणार होते त्याचवेळी शाहरुख फौजी नावाच्या टीव्ही शोमध्ये काम करत होता. मात्र यानंतरही गौरीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता.
-
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, गौरी खानचा भाऊ विक्रांत खूप दबंग होता आणि त्याला शाहरुख अजिबात आवडत नव्हता.
-
विक्रांतने एकदा शाहरुख खानवर बंदूक रोखली होती आणि आपल्या बहिणीपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. मात्र या धमकीनंतर शाहरुख खानला काही फरक पडला नव्हता.
-
शाहरुख खानवर लिहिण्यात आलेलं पुस्तक ‘King of Bollywood: Shah Rukh Khan and the Seductive World of Indian Cinema’ मध्ये पत्रकार अनुपमा चोप्राने शाहरुख आणि गौरीच्या अफेअरशी संबंधित हा किस्सा सांगितला आहे.
-
पुस्तकानुसार, गौरीच्या आईलादेखील शाहरुख खान पसंत नव्हता. मात्र यामागे एक कारण होतं.
-
पुस्तकात उल्लेख आहे की, गौरीचे वडील रमेश छिब्बर यांना शाहरुखचा धर्म नाही तर त्याच्या अभिनय क्षेत्रावरुन आक्षेप होता.
-
सगळ्यांकडून विरोध होत असातनाही शाहरुख आणि गौरी मात्र लग्न करण्यावर ठाम होते.
-
गौरी आणि शाहरुखने अखेर २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता ३० वर्ष झाली आहेत. लग्नानंतर दोन्ही कुटुंबांनी त्यांनी स्वीकारलं. गौरीच्या कुटुंबानेही शाहरुखला आपला जावई म्हणून पसंती दिली आहे.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल