-
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनचा अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले.
-
विशेष म्हणजे या चित्रपटानंतर झिरो फिगर या संकल्पनेला छेद देण्यास विद्या यशस्वी ठरली.
-
आज लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्याचा आवर्जुन नाव घेतं जातं.
-
‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाला नुकतीच १० वर्ष पूर्ण झाली.
-
‘द डर्टी पिक्चर’मध्ये विद्याने दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारली होती.
-
हा चित्रपट साइन करताना अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं, असा खुलासा विद्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.
-
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली, “ज्या क्षणी मी मिलनला (मिलन लुथरिया, चित्रपटाचे दिग्दर्शक) भेटले, त्याच क्षणी मला त्यांच्यावर विश्वास बसला होता. मला ठाऊक होतं की त्या भूमिकेचं एक विशिष्ट सौंदर्य आहे आणि ते अजिबात कमी दर्जाचं नाही. या प्रोजेक्टमध्ये एकता कपूरसुद्धा सहभागी होती आणि तीसुद्धा एक महिला आहे. माझ्या करिअरची सुरुवात एकता कपूरमुळे झाली आणि मी तिला नीट ओळखते. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तीरेखेविषयी मला काही शंका नव्हत्या. पण असे अनेक लोक होते ज्यांनी मला अक्षरश: वेडं ठरवलं होतं. अशा भूमिका तू करू शकत नाहीत, तुझ्या प्रतीमेला धक्का पोहोचेल असं अनेकजण म्हणत होते.”
-
विद्याने ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट स्वीकारण्यापूर्वी आई-वडिलांना त्याबद्दल विचारलं होतं. त्यावेळी तुला जे योग्य वाटतं ते कर, असं म्हणत त्यांनी विद्याला पाठिंबा दिला.
-
सिल्क स्मिताची भूमिका साकारण्याबाबत विद्या ठाम होती.
-
‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट त्याकाळी बराच चर्चेत राहिला.
-
मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटामुळे विद्याच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं.
-
या चित्रपटातील अभिनयासाठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.
-
सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करणारी विद्या आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’, ‘कहानी’, ‘मिशन मंगल’, ‘शकुंतलादेवी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विद्याने काम केलं असून तिच्या भूमिका गाजल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : विद्या बालन / इन्स्टाग्राम)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा