-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका फक्त आपल्या देशात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे.
-
त्यात जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेता दिलीप जोशी हे घराघरात प्रसिद्ध आहेत.
-
दिलीप जोशी हे या मालिकेतील सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार आहेत.
-
पण तुम्हाला माहितीय आहे का? दिलीप जोशींच्या ऐवजी जेठालाल हे पात्र अभिनेता राजपाल यादव यांना ऑफर करण्यात आले होते.
-
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राजपाल यादवला जेठालाल भूमिकेला नकार दिल्याची खंत वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
रेडीओ होस्ट सिद्धार्थ खन्नाच्या प्रश्नावर राजपाल यादव म्हणाला, “नाही नाही..जेठालाल हे पात्र एका चांगल्या कलाकाराला आणि अभिनेत्याला देण्यात आलं आहे.
-
“मी प्रत्येक पात्राला त्या कलाकाराचं पात्र मानते.” असं म्हणत राजपालने दिलीप जोशी याचं कौतुक केलं.
-
“आम्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात आहोत. त्यामुळे मला कोणत्याही कलाकाराच्या भूमिकेत स्वत:ला पाहण्याची आवश्यकता भासत नाही,” असे राजपालने सांगितले.
-
“तसचं मला वाटतं माझ्यासाठी म्हणजेच राजपाल यादवसाठी तयार केलेल्या भूमिका मला मिळो,” असेही त्याने म्हटले.
-
“मात्र एखाद्या अभिनेत्याने मोठ्या कष्टाने लोकप्रिय ठरवलेली भूमिका साकारण्याची माझी इच्छा नाही.” असेही राजपाल म्हणाला.
-
जेठालालची भूमिका नाकारण्याचं आपल्याला अजिबात दु:ख नसल्याचं राजपाल यादवने स्पष्ट केलं होतं.
-
बॉलिवूड कॉमेडी अभिनेता राजपाल यादव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
राजपाल यादवने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.
-
यामधील ‘चूप चूप के’, ‘मुझसे शाही करोगी’, ‘भुलभुलैया’ या सारख्या अनेक चित्रपटामध्ये धमाल विनोदी भूमिका साकारात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

मराठी भाषेवरुन रितेश देशमुखला डिवचणाऱ्या पुनीतवर भडकले डीपी दादा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “तुझी लायकी…”