-
अभिनेता विशाल निकम ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला.
-
बिग बॉसचे विजेतेपद मिळालेल्या विशाल निकमने नुकतंच महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोतिबाचे दर्शन घेतले.
बिग बॉसचे विजेतेपद मिळालेल्या विशाल निकमने नुकतंच महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोतिबाचे दर्शन घेतले. -
यावेळी विशाल निकमसोबत अभिनेता आणि बिग बॉसमधील स्पर्धक विकास पाटीलही उपस्थित होता.
याचे अनेक फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावेळी त्या दोघांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे देखील दर्शन घेतले. -
कोल्हापूरमधील जोतिबाच्या मंदिरात त्या दोघांनी गुलालही उधळला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
दरम्यान विशाल निकम आणि विकास पाटील हे दोघेही बिग बॉसच्या घरात चांगले मित्र बनले होते. त्यांच्या मैत्रीचे प्रचंड कौतुक केले जात होते. -
बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर त्या दोघांनी जोतिबाच्या मंदिरात जात दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी जोतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोषही केला.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला