-
अभिनय क्षेत्रात नेहमीच पाहिलं जातं की मोठमोठे कलाकार आपल्या करियरला एका उंचीवर नेल्यानंतरच लग्न करतात. त्यामुळे बहुतांश कलाकार आपल्या तिशीत बोहल्यावर चढतात. मात्र, असेही कलाकार आहे ज्यांनी वयाच्या विशीतच लग्न केलं. यात कुणी आपल्या वर्गमैत्रिणीसोबत लग्न केलं, तर कुणी आपल्या सहकलाकारासोबत गाठ बांधली. याच कलाकारांचा आढावा.
-
अभिनेता सुयश रायने त्याची मैत्रीण किश्वर मर्चंटसोबत वयाच्या २७ व्या वर्षी लग्न केलं. इतकंच नाही, तर किश्वर सुयशपेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे.
-
करणवीर सिंह बोहराने त्याची प्रेयसी तीज सिद्धूसोबत २००६ मध्ये लग्न केलं होतं. तेव्हा त्याचं वय केवळ २४ वर्षे होतं. या जोडीला आता जुळ्या मुली आहेत. त्यांची नावं वियना आणि बेला अशी आहेत.
-
अविनेश रेखीने देखील २६ व्या वर्षी लग्न केलं होतं. अविनेशने २०१० मध्ये आपली मैत्रीण रईसासोबत गाठ बांधली.
-
टीव्ही अभिनेता हुसैन कुवाजेर्वालाने त्याची प्रेयसी टीनासोबत २००५ मध्ये लग्न केलं. तेव्हा त्याचं वय केवळ २७ वर्षे होतं.
-
अर्जुन पुंजने संजीवनीमधील आपली सहकलाकार गुरदीप कोहलीसोबत २००६ मध्ये लग्न केलं होतं आणि तेव्हा त्याचं वय केवळ २४ वर्षे होतं.
-
अभिनेता गुरमीत चौधरीने आपली सहकलाकार देबीना बॅनर्जीसोबत २०११ मध्ये लग्न केलं होतं. तेव्हा गुरमीत केवळ २७ वर्षांची होती.
-
रजत टोकसने २०१५ मध्ये सृष्टी नय्यरसोबत लग्न केलं. तेव्हा त्याचं वय २४ वर्षे होतं.
-
अभिनेता वरुण कपूरने आपली मैत्रीण धन्या मोहनसोबत वयाच्या २६ व्या वर्षी लग्न केलं होतं.
-
बरुन सोबतीने २५ व्या वर्षी आपली वर्गमैत्रीण पश्मीन मनचंदासोबत एका गुरुद्वारात लग्न केलं. (सर्व फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल