-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉलला ओळखले जाते. या शो मुळे अनेकांना आपल्या सुरेल आवाजाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली आहे.
-
‘इंडियन आयडल’ या शोमुळे अनेकांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडॉल हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे.
-
या कार्यक्रमात आपल्या सुरेल आवाजाने त्याची वेगळी ओळख निर्माण करणारा स्पर्धक म्हणजे मराठमोळा जगदीश चव्हाण.
-
जगदीश हा शोच्या लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. आतापर्यंत त्याने भक्तिगीते, बॉलिवूड, पॉप गाणी गाऊन परिक्षकांची मने जिंकली आहे.
-
या मुलाखतीत जगदीशने त्याच्या संघर्षाबद्दल, आई-वडिलांच्या सहकार्याबद्दल आणि बंजारा आदिवासी समाजाबद्दल अनेक गोष्टींबाबत भाष्य केले आहे.
-
मात्र इंडियन आयडॉलपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास हा फार संघर्षमय होता. नुकतंच जगदीशने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे.
-
या मुलाखतीत जगदीशला इंडियन आयडॉल मराठी या शो मध्ये कशाप्रकारे संधी मिळाली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला, “मी इंडियन आयडॉलसारख्या शोचा भाग होऊ शकेन, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत. आमच्या घरी टीव्ही नाही. कारण टीव्ही घेणे आम्हाला परवडत नाही.
-
“आमचं घरं फार लहान आहे. माझी आई शेजारच्या घरी जाऊन टीव्ही बघते. आजही इंडियन आयडॉलचा कार्यक्रम बघण्यासाठी, माझे गाणे ऐकण्यासाठी ती शेजाऱ्यांच्या घरी जाते,” असे तो म्हणाला.
-
“माझी आई मला अनेकदा विचारायची की अनेक लोक टीव्हीवर जातात, मग तू तिकडे का जात नाही? तिच्या या प्रश्नावर मी अनेकदा हसायचो. पण तिचे हे स्वप्न खरं होईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती,” असे जगदीशने सांगितले.
-
“एकेदिवशी इंडियन आयडॉल मराठीसाठी व्हर्च्युअल ऑडिशन सुरु आहे, असे मला समजले. मी सहजच त्यांना माझी ऑडिओ क्लिप पाठवली. पण त्यानंतर इंडियन आयडॉलच्या टीमने मला बोलावले आणि माझी निवड झाल्याचे मला सांगितले,” असे जगदीश म्हणाला.
-
नुकतंच माझ्या आईने माझा परफॉर्मन्स शोमध्ये येऊन प्रत्यक्ष पाहिला.
-
त्यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, “मी माझ्या आईला शो मध्ये पाहिल्यावर आश्चर्यचकित झालो. तिने आमच्या आदिवासी परंपरेप्रमाणे कपडे घातले होते. ती ज्यावेळी शोमध्ये आली त्यावेळी मी भावूक झालो.”
-
“तिने घातलेले कपडे आणि ऑक्सिडाइज्ड दागिने…हे सर्व आम्ही फक्त काही असेल तरच घालतो. आमच्या समाजातील मोठा समारंभ किंवा एखादे लग्न असेल तर ते घातले जाते. त्यामुळे तो दिवस माझ्यासाठी दिवाळीसारखा होता,” असेही त्याने सांगितले.
-
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल पाहायला मिळत आहे.
-
“मी आतापर्यंत या दोघांनाही फक्त टीव्हीवर पाहिले आहे. पण एवढ्या लोकप्रिय जोडीचे मार्गदर्शन मला मिळेल, असे मला कधीच वाटले नव्हते,” असेही जगदीशने म्हटले.
-
“मी बंजारा आदिवासी समाजातील आहे. माझ्या समाजातील तरुण व्यसनाधीन आहेत. त्यामुळे मला त्यांच्यासमोर एक चांगला आदर्श ठेवायचा आहे,” असेही तो म्हणाला.
-
“इंडियन आयडॉल मराठीसारख्या शोमध्ये मी माझ्या समाजाचे प्रतिनिधित्व करू शकलो याचा मला खरोखर अभिमान आहे,” असेही त्याने सांगितले.
-
“त्यामुळे मला हे सिद्ध करायचे होते की माझ्यासारखे बंजारा समाजातील लोक इंडियन आयडॉलच्या मंचावर जाऊन प्रेक्षकांची मने जिंकू शकतात,” असेही जगदीशने सांगितले.

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल