-
केवळ बॉलीवूडच नाही तर टीव्ही स्टार्सनीही सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत. चला पाहूयात काही फोटो..
-
अक्षय कुमार मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या अपार्टमेंटच्या टेरेसवर पतंग उडवताना दिसत आहे.
-
तर हेमा मालिनी यांनी पोंगल बनवून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घातला. पितळी हंडीत ड्रीमगर्लने पोंगल बनवतानाचा फोटोही शेअर केला आहे.
-
हेमा मालिनी प्रमाणेच त्यांची मुलगी ईशा देओल देखील पितळेच्या भांड्यात पोंगल बनवताना दिसली. तिने आपल्या आईची परंपरा पुढे नेत असल्याचे सांगत तिच्या इन्स्टावर व्हिडीओ शेअर केला.
-
सीरियल ‘गुम है किसी के प्यार में’ मधील साई म्हणजेच अभिनेत्री आयशा सिंगने मकर संक्रांतीला दान केले आणि खिचडी बनवली.
-
‘घर एक मंदिर-कृपा अग्रसेन महाराज की’ या टीव्ही शोमध्ये गेंदाच्या भूमिकेत दिसणारी गुजराती मुलगी श्रेनू पारीख हिने राजस्थानमध्ये शूटिंग करताना संक्रांती साजरी केली.
-
‘हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की’ या मालिकेत दिसलेल्या आदिती सजवानने तिच्या मूळ गावी उत्तराखंडमध्ये संक्रांती साजरी केली. आदितीने पतंगही उडवले.
-
२०२० मध्ये अमिताभ बच्चन यांनी अहमदाबादमध्ये पतंग उडवला होता. पण करोनामुळे त्यांनी यावेळी घरीच संक्रांती साजरी केली.
-
शाहरुख खान देखील संक्रांतीच्या दिवशी अनेकदा पतंग उडवतानाचे फोटोही शेअर करतो. हा फोटो त्याचा झिरो चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हाचा आहे. (फोटोः सोशल मीडिया)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल