-
दाक्षिणात्य अभिनेता धनुषने सोमवारी (१८ जानेवारी) आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळे होण्याची घोषणा केली.
-
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचे २००४ मध्ये लग्न झाले आणि त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला.
-
ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.
-
अभिनेता, दिग्दर्शक व अफलातून डान्सर प्रभूदेवाने २०११ साली पत्नी रामलताला घटस्फोट दिला.
-
खलनायकी भूमिका साकारुनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते प्रकाश राज यांनी अभिनेत्री ललिताशी १९९४ साली लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि चित्रपट निर्माता नागार्जुन अक्किनेनीने १९८४ मध्ये लक्ष्मी दग्गुबतीसोबत लग्नगाठ बांधली.
-
नागार्जुन आणि लक्ष्मीने १९९० साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने २०१० मध्ये चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केलं होतं मात्र या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्यानं २०१७ मध्ये तिनं घटस्फोट घेतला. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल