-
स्टार प्रवाहवर ३१ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
-
या मालिकेत मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे.
-
या मालिकेत अधोक्षज बंटी हे पात्र साकारणार असून या भूमिकासाठी तो खूपच उत्सुक आहे.
-
बंटी हा पिंकीचा अगदी जवळचा मित्र… पहिल्यांदा मैत्री आणि कालांतराने एकतर्फी प्रेम करणारा मस्तमौला तरुण.
-
या अनोख्या भूमिकेविषयी सांगताना अधोक्षज म्हणाला, बंटी हे अतिशय कलरफुल पात्र आहे. आमची पटकथा लेखिका श्वेता पेंडसेने खूप उत्तमरित्या ते मला समजावलं आहे.
-
पिंकीवर मनापासून प्रेम करणारा आणि सतत तिच्यासाठी धडपडणारा असा हा बंटी.
-
मालिकेची टीम खूप भन्नाट आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय. आम्ही साताऱ्यातल्या एका गावात काम करतोय. त्यामुळे प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद मिळतोय.
-
स्टार प्रवाहसोबत याआधी ‘छोटी मालकीण’ आणि ‘लक्ष्य’ या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे बंटी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असेल.
-
आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडेल.
-
खाईन तर तुपाशी अश्या ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे.
-
पिंकीच्या रहाण्यातून, वागण्यातून आणि बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवतं. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL