-
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी कामगिरी करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.
-
मध्य प्रदेश, गोवा, आसाम, कर्नाटक या राज्यांत हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
-
तर महाराष्ट्रातही ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे.
-
परंतु अशाप्रकारे टॅक्स फ्री करण्यात आलेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा काही पहिला चित्रपट नाहीये. याआधीही अनेक बॉलिवूड चित्रपट करमुक्त केले गेले आहेत.
-
२०१७ साली प्रदर्शित झालेला ‘हिंदी मिडियम’ हा चित्रपट देखील दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांत करमुक्त करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनपटलावर आधारित असलेला ‘सचिन: अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट महाराष्ट्रसह दिल्ली, छत्तीसगड आणि केरळमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
तर २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘सरबजीत’ या बॉलिवूड चित्रपटवरील मनोरंजन कर उत्तर प्रदेश सरकारकडून माफ करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
आमिर खान मुख्य भूमिकेत असलेला ‘दंगल’ हा चित्रपटसुद्धा दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यांत करमुक्त करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
हवाई सुंदरी नीरजाच्या शौर्याची कथा सांगणारा ‘नीरजा’ हा चित्रपट महाराष्ट्रसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
२०१६ साली प्रदर्शित झालेला ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट उत्तर प्रदेश, बिहार या दोन राज्यांत करमुक्त करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
‘मांजी: द माऊंटन मॅन’ या बॉलिवूड चित्रपटवर बिहार आणि उत्तराखंड राज्यात मनोरंजन कर आकारण्यात आला नव्हता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट देखील उत्तर प्रदेशात करमुक्त करण्यात आला होता. मराठा साम्राज्याचे पेशवा पहिला बाजीराव आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम हिच्या जीवनसंघर्षाची कथा सांगणारा ‘मेरी कॉम’ हा चित्रपट महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांत टॅक्स फ्री करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटवरील मनोरंजन कर उत्तर प्रदेश सरकारकडून माफ करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा सांगणारा ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यात करमुक्त करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
२०२० साली प्रदर्शित झालेला दीपिका पादुकोनच्या ‘छपाक’ या चित्रपटवरील मनोरंजन कर राजस्थान सरकारकडून माफ करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)
-
हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असलेला ‘सुपर ३०’ हा चित्रपट देखील बिहार सरकारकडून करमुक्त करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: आयएमडीबी)

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद दोन मिनिटांत गुंडाळली, पोलीस म्हणाले…