-
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीरसिंह राजे याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
-
लाडूला प्रेक्षक आजही विसरले नाही आहेत. आता राजवीर प्रेक्षकांना किचन कल्लाकारच्या किचनमध्ये दिसणार आहे.
-
किचन कल्लाकारच्या आगामी भागात बच्चे कंपनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
या भागात राजवीरसोबत अभिनेत्री स्नेहलता वसईकरची मुलगी शौर्या वसईकर आणि गायक राहुल देशपांडेची मुलगी रेणुका देशपांडे देखील सहभागी होणार आहे.
-
ही मुलं कल्लाकारच्या किचनमध्ये खूपच कल्ला करताना दिसणार आहेत. लाडू म्हणजे छोटा पहेलवान आणि त्याला सामान मिळवण्यासाठी शेठ यांच्यासोबत बैठका मारण्याची स्पर्धा करावी लागणार आहे.
-
शौर्याला देखील सामान मिळवण्यासाठी अनेक कडू, गोड, आंबट रसांचा आस्वाद घ्यावा लागला.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL