-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
मौनी सोशल मीडियावरही सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
छोट्या पडद्यावरून मौनीने कलाविश्वात पदार्पण केलं. ‘नागिण’ या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
-
नुकतंच मौनीने फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये मौनीने फिकट गुलाबी रंगाची नक्षीदार साडी परिधान केली आहे.
-
मॅचिंग खड्यांची ज्वेलरी आणि साजेसा मेकअप केला आहे.
-
बिकिनी आणि वेस्टर्न लूकमध्ये हॉट दिसणारी मौनी साडीतही अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच मौनी एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे.
-
फोटोमध्ये मौनीने डान्सिंग पोझ देखील दिल्या आहेत.
-
मौनीच्या या डान्सिंग पोझमधील फोटोशूटची अभिनेत्री अमृता खानविलकरला भूरळ पडली आहे. या फोटोंवर अमृताने ‘जस्ट वाह’ अशी कमेंट केली आहे.
-
साडीतील मौनीचा मोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव