-
कंगना रनौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो लॉक अप (Lock Upp) सध्या बराच चर्चेत आहे. या शोचं प्रसारण एमएक्स प्लेयर (MX Player) आणि अल्ट बालाजीसारख्या (Alt Balaji) ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर केलं जात आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहरे या शोमध्ये कैदी बनले आहेत. मात्र, असेही अनेक चेहरे आहेत ज्यांना या शोमध्ये कैदी बनण्याची ऑफर देण्यात येऊनही त्यांनी या ऑफरला लाथ मारली. त्याच सेलिब्रिटींचा हा आढावा.
-
उर्फी जावेद कंगनाच्या लॉक अप शोमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, उर्फीने या शोमध्ये सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला.
-
अभिनेत्री श्वेता तिवारीने देखील लॉक अप शोमध्ये स्पर्धक म्हणून कैदी होण्यास नकार दिला आहे.
-
या शोच्या टीमने रश्मी देसाईशी देखील संपर्क केला होता. मात्र, रश्मी देसाईने शोचा भाग होण्यास नकार दिला.
-
बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावतला देखील या शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती. मात्र, अद्याप तिने यावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
-
जॅस्मिन भसीनने देखील या शोमध्ये कैदी होण्याबाबत अद्याप होकार दिलेला नाही.
-
राखी सावंतचा एकेकाळचा पती रितेश सिंहला देखील या शोची ऑफर आली होती. रितेश देखील अद्याप या शोमध्ये सहभागी झालेला नाही.
-
Photos: Social Media

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”