-
बॉलीवूडच्या एका मुस्लिम दिग्दर्शकाने हिंदू अभिनेत्रीशी एकदा नव्हे तर चार वेळा लग्न केले. या लग्नामागेही अनेक कारणे होती.
-
दिग्दर्शक दानिश अस्लमने टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रुती सेठसोबत लग्न केले आहे. दोघांचे हे लग्न एका खास दिवशी झाले, पण चार वेळा लग्न करण्याचे कारण काय होते, जाणून घेऊया.
-
कॉमेडी शो ‘शरारत’ फेम श्रुतीने ‘फना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच चित्रपटाच्या सेटवर तिची भेट दानिशशी झाली, जो चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहलीचा सहाय्यक होता.
-
दोघांची पहिली भेटही खूप मजेदार होती. सेटवर युनिटशी बोलत दानिश ओरडून ओरडून बोलत होता. तेव्हा जवळच उभ्या असलेल्या श्रुतीने दानिशच्या मागच्या खिशात ठेवलेला माईक काढला आणि दानिशला माझ्याकडेही माईक आहे, असं सांगितलं.
-
दानिशने एका मुलाखतीत सांगितले होते की, या दिवसापासून ते दोघे एकमेकांना नऊ दिवस दिवसाला ५० मेसेज करत होते.
-
यानंतर त्यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले आणि त्यानंतर लग्नाची वेळ आली. दोघांनी लग्नासाठी खूप खास दिवस निवडला जेणेकरून त्यांचे लग्न अविस्मरणीय राहील. दोघांनी १० ऑक्टोबर २०१० (१०. १०.१०) रोजी लग्न केले.
-
दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने लग्नात अडचण आली. दानिशने सांगितले होते की, दोघांचे आई-वडील तयार नव्हते, पण कसेतरी त्यांनी पालकांना मनवले. सर्वप्रथम दोघांनी गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते.
-
त्यानंतर आई-वडिलांना खूश करण्यासाठी दोघांनी हिंदू, नंतर मुस्लिम आणि नंतर कोर्ट मॅरेज केले.
-
दानिश आणि श्रुतीच्या लग्नाचं सेलिब्रेशन तीन दिवस चाललं आणि या तीन दिवसात दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने चार वेळा लग्न केले. (सर्व फोटो – सोशल मीडिया)
-
श्रुती सेठ सध्या तिच्या ‘ब्लडी ब्रदर्स’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
-
‘ब्लडी ब्रदर्स’मध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसेसोबत श्रुतीने किसिंग सीन दिला आहे.
-
या सीनमुळे दोघींची चांगलीच चर्चा होती.
-
तर, हा सीन फार विनोदी असल्याचं श्रृतीने म्हटलं होतं.
-
श्रृतीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
(फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग