-
ढोल-ताशांचा गजर, शाहिरी पोवाडे, डफाची थाप, गोंधळ, जागरण आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष अशा भारावलेल्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात ‘शेर शिवराज’ चित्रपटातील कलाकारांचे साताऱ्यातील स्थानिकांनी जंगी स्वागत केले.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सातारा दौऱ्यावर असणाऱ्या चित्रपटाच्या टीमने यावेळी प्रतापगडाला भेट दिली.
-
प्रतापगडावरील भवानीमातेचा आशीर्वाद घेत इतिहासाचे आणि चित्रपटातील किस्स्यांचे अनेक पैलू यावेळी चित्रपटातील कलाकारांनी उलगडले.
-
याप्रसंगी ‘शेर शिवराज’ चित्रपटातील अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड, अक्षय वाघमारे आणि निर्माते प्रद्योत पेंढरकर, नितीन केणी उपस्थित होते.
-
गडकोटांच्या संवर्धनासाठी अग्रेसर असणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांच्या कार्याला सलाम म्हणून ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे निर्माते चिन्मय मांडलेकर, प्रद्योत पेंढरकर, नितीन केणी यांनी श्रमिक गोजमगुंडे यांना धनादेश सुपूर्द केला.
-
शिवचरित्रातील अफजलखान वधाच्या महत्त्वपूर्ण अध्यायामध्ये प्रतापगडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
-
येत्या २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या पार्श्वभूमीवर ‘शेर शिवराज’ चित्रपटातील कलाकारांनी माध्यम प्रतिनिधींसह प्रतापगडाला भेट देत हा इतिहास पुन्हा जिवंत केला.
-
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी यावेळी प्रतापगड आणि अफजलखान वधाच्या चित्तथरारक घटनाक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.
-
शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची, संयम, शिष्टाई आणि चतुराई या अद्भुत गुणांचे दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटातून घडणार आहे.
-
त्याआधी चित्रपटाच्या टीमने राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांची ‘जलमंदिर पॅलेस’ सातारा येथे सदिच्छा भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.
-
‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची आहे.
-
या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, सुश्रूत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
-
ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो, तो अफझलखान वधाचा ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शेर शिवराज / इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक