-
प्रसिद्ध गायक अरिजित सिंग याचा आज वाढदिवस.
-
अरिजितचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं झाला.
-
अरिजितचे वडील पंजाबी तर आई बंगाली आहे.
-
सोनी वाहिनीवरील ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोद्वारे २००५ मध्ये अरिजितने संगीतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
-
परंतु, हा शो त्याला जिंकता आला नाही.
-
हार न मानता त्याने ‘१० के १० ले गए दिल’ या अन्य रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या शोचादेखील तो विजेता होऊ शकला नाही.
-
या शोमध्ये त्याचा सामना दुसऱ्या रिअॅलिटी शोच्या विजेत्यांबरोबर होता.
-
बऱ्याच काळापर्यंत अरिजितने सहाय्यक संगीत प्रोग्रॅमर म्हणून शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर आणि मिथुन या दिग्गज्यांबरोबर काम केलं.
-
२०११ मध्ये ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ गाण्याद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये गायक म्हणून सुरुवात केली.
-
यानंतर अरिजितने संगीतकार प्रीतमबरोबर ‘एजंट विनोद’, ‘प्लेअर्स’, ‘कॉकटेल’ आणि ‘बर्फी’सारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली.
-
अरिजितला खरी ओळख ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने दिली.
-
या गाण्यासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
-
२०१४ मध्ये त्याने प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानबरोबरदेखील काम केलं.
-
आज अरिजित जगभरात गाण्याचे कार्यक्रम सादर करत असून, त्याला ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येत चाहते उपस्थित असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अरिजित सिंग / इन्स्टाग्राम)

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग