-
आमिर खानची एक्स पत्नी किरण राव हिने त्याला एक व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडलं. दुग्धपदार्थांचे सेवनही त्याने टाळलं आहे
-
बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील पेटा (PETA) या संस्थेने हॉटेस्ट शाकाहारी सेलिब्रिटीचा किताब दिला. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरावे म्हणून अमिताभ यांनी मद्यपान, धूम्रपान, मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केलं.
-
अभिनेत्री भूमी पेडणेकरने लॉकडाऊनच्या काळात मांसाहारी पदार्थ खाणं बंद केलं. पण याआधी ती मांसाहारी पदार्थांचे सेवन करत होती.
-
कंगना रणौतच्या घरी मांसाहारी पदार्थ तयार केले जायचे. मात्र अध्यात्मिकदृष्ट्या हे पदार्थ खाणं तिच्या मनाला पटत नसल्याने तिने मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं पूर्णपणे बंद केलं.
-
पेटा (PETA) या संस्थेचा ‘पर्सन ऑफ द इयर’ हा किताब आर माधवनच्या नावे आहे. कत्तलखान्यामध्ये काय चालतं हे जर तुम्ही पाहिलात तर तुमची देखील मांस खाण्याची भूक कमी होईल असे आर माधवनचं म्हणणं आहे.
-
काही वर्षांपासून रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी मांसाहारी पदार्थ खाणं बंद केलं. या दोघांनी ‘इमॅजिन मीट्स’ नावाची कंपनीही सुरु केली. वनस्पती आधारित मांसाचे सेव रितेश-जेनेलिया करतात.
-
अभिनेता शाहिद कपूर सुद्धा शाकाहारी आहे. वडिल पंकज कपूर यांनी त्याला गिफ्ट केलेलं ‘ब्रायन हाइन्स, लाइफ इज फेअर’ हे पुस्तक वाचून त्याने मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केलं.
-
२०२०मध्ये पेटा (PETA) या संस्थेने सगळ्यात हॉटेस्ट शाकाहारी सेलिब्रिटी किताब अभिनेत्री श्रद्धा कपूरला दिला. मांसाहारी पदार्थ खाण्याबाबत तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट देखील शेअर केली होती.
-
पेटा (PETA) कुकबूकपासून प्रेरित होऊन श्रद्धा कपूरने हा निर्णय घेतला होता. अजूनही ती शाकाहारीच आहे, (सौजन्य – सगळे फोटो फाईल)

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा