-
अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह क्रिकेटपटु ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमनच्या लग्नाला हजेरी लावली होती. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
या लग्नाला अनुष्काबरोबरच क्रिकेटपटु फाफ डु प्लेसिस आणि त्याची पत्नी इमारी देखील आली होती. या विवाहसोहळ्याला तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती.
-
इमारीने परिधान केलेली साडी अनुष्काने एका कार्यक्रमात परिधान केलेल्या साडी सारखीच होती. त्यामुळे अनुष्काने तिला आपली साडी दिली की काय अशा चर्चा रंगू लागल्या.
-
इमारीला हिरव्या रंगाच्या साडीमध्ये पाहून अनुष्काने २०१८मध्ये एका कार्यक्रमात हिच साडी परिधान केली अशी कमेंट युजर्सने केली. तर काहींनी ही साडी तुला कुठून मिळाली? असं देखील इमारीला विचारलं.
-
इमारीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील या लग्नादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोला अनुष्काने पसंती दर्शवली होती.
-
इमारीने तिच्या पती आणि मुलांसह लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खुलून दिसत होती.
-
त्याचबरोबरीने फाफने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच फाफइमारीच्या मुलांनी देखील गुलाबी रंगाचे ड्रेस परिधान केले होते.
-
अनुष्का लग्नानंतर तिच्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. पतीसह मुलगी वामिकाबरोबर ती अधिकाधिक वेळ घालवते.
-
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटपटु झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस हा चित्रपट ती करत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी