-
लॉक अप शोचं पहिलं पर्व जिंकणारा मुनव्वर फारूखी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे.
-
लॉकअप शोमध्ये अंजली अरोरासोबतच्या मैत्रीमुळे नेहमीच चर्चेत राहलेल्या मुनव्वरनं शो संपल्यानंतर त्याच्या मिस्ट्री गर्लबाबत खुलासा केला.
-
‘लॉक अप’ शो जिंकल्यानंतर मुनव्वरनं त्याच्या गर्लफ्रेंडसोबचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
याशिवाय शो संपल्यानंतर झालेल्या पार्टीमध्येही त्याच्या गर्लफ्रेंडनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर ती नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
-
सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या मुनव्वर फारूखीच्या मिस्ट्री गर्लचं नाव नाझिला सिताशी असं आहे.
-
मुनव्वरची गर्लफ्रेंड नाझिला सिताशी ही एक मॉडेल, युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर आहे.
-
मुनव्वरनं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये नाझिला चेहरा दाखवला नव्हता मात्र पार्टीमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचा चेहरा समोर आला.
-
शिवम शर्मानं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये नाझिला आणि मुनव्वर एकत्र डान्स करताना दिसले होते.
-
तसेच या शोमध्ये सहभागी झालेल्या सदस्यासोबत तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
नाझिला सिताशी ही २० वर्षांची असून ती मूळची ओमनच्या मस्कटची रहिवासी आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच नाझिला पुणे येथे शिफ्ट झाली असून ती टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
-
नाझिलानं २०२० मध्ये स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. ज्यावरून ती फूड, ट्रॅव्हल आणि फॅशन व्लॉगिंग करते.
-
इन्स्टाग्रामवर नाझिलाचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
नाझिला आणि मुनव्वर यांची भेट कधी आणि कशी झाली याची माहिती उपलब्ध नाही मात्र या शोमध्ये मुनव्वरनं तिचं खूप कौतुक केलं होतं.
-
शो संपल्यानंतर गर्लफ्रेंडबद्दल खुलासा करणार असल्याचं एकदा मुनव्वर म्हटलं होतं आणि त्याने तसं केलं देखील.
-
मुनव्वर विवाहित असून त्याचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. याचा खुलासा कंगनानं लॉक अप शोमध्ये केला होता.
-
पहिल्या पत्नीपासून मुनव्वरला एक मुलगा आहे. त्या दोघांनी लग्नाच्या ५ वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
-
मुनव्वर मागच्या दीड वर्षापासून पत्नीपासून वेगळा राहत आहे. त्यांच्या घटस्फोटाची अंतिम सुनावणी बाकी आहे. (फोटो- नाझिला सिताशी इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी