-
झोया अख्तर दिग्दर्शत ‘द आर्चीज’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
या चित्रपटातून बरेच स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
-
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
हा चित्रपट आर्ची कॉमिक्सवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे.
-
बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुखची मुलगी सुहाना खान या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने जोया अख्तर आणि रीमा कागती पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.
-
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
या चित्रपटात सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या स्टारकिड्ससोबतच अभिनेत्री डॉट, मिहिर आहूजा, वेदांग रैना, युवराज मेंडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
हा चित्रपट २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात चार मित्रांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात येणार आहे.
-
‘द आर्चीज’ हा एक म्युजिक ड्रामा आहे.
-
चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो सौजन्य : यूट्यूब)

अष्टकोनी आकाराचा बंगला, सात दरवाजे अन्…; सेलिब्रिटी जोडपं का सोडणार आलिशान घर? कारण आलं समोर