-
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे केवळ चांगले अभिनेतेच नाहीत तर त्यांच्यात इतरही अनेक कला आहेत. काहींकडे अभिनयाबरोबरच गायनाची कला आहे तर काहींकडे मिमिक्री आहे. त्याचबरोबर अनेक स्टार्स आहेत जे अभिनयासोबतच चांगले कवी आहेत आणि लोकांना त्यांच्या कविता खूप आवडतात.
-
धर्मेंद्र हे अनेकवेळा त्यांच्या कविता आणि त्या कविता बोलताना दिसले आहेत. त्यांची ही कला लोकांना खूप आवडते.
-
फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर यांचे नाव मोठ्या शायरांमध्ये घेतले जाते. फरहानने वडिलांकडून शिकून अनेक वेळा कविताही लिहिल्या आहेत.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडल्यानंतर प्रकाशझोतात आलेले शैलेश लोढा हे कवी आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक कविता लिहिल्या असून अनेक कार्यक्रमात सहभागही घेतला आहे.
-
अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे प्रख्यात कवी होते आणि ती गुणवत्ता बिग बींमध्येही आहे. यांनी लिहिलेल्या कविताही अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
पियुष मिश्रा यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’सह इतर अनेक चित्रपटांतील अभिनयाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर पियुष मिश्रा हे उत्तम कविताही देखील लिहित असतात आणि गाणे सुंदर गातात.
-
अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या शालेय-कॉलेजच्या दिवसांपासून लिहिण्याची आवड आहे आणि त्याने अनेक कविता लिहिल्या आहेत. या कविता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. (photo: ayushmann khurrana/ instagram)
-
बॉलीवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा आशुतोष राणा एक चांगला कलाकार तर आहेच, पण त्यांच्या कविताही खूप सुंदर आहेत. त्यांच्या अनेक कविता तुम्हाला सोशल मीडियावर वाचायला मिळतील.
-
मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये गोलू गुप्ताची भूमिका साकारणारी श्वेता त्रिपाठी शर्मा उत्तम कविता लिहीत असते आणि सादर करते. तिची ‘तुम लडकी हो’ ही कविता चाहत्यांना चांगलीच आवडली होती.

Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”