-
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची २९ मेला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
-
पंजाब सरकारने सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
-
सिद्धू मूसेवाला यांचं खरं नाव शुभदीप सिंग सिद्धू असं होतं.
-
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मूसा गावात जन्मलेल्या मूसेवाला यांनी गीतकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
गायकासोबतच ते उत्तम अभिनेता देखील होते.
-
२०१७ मध्ये, त्यांनी त्यांचं पहिलं गाणं ‘सो हाय’ रिलीज केलं होतं.
-
त्यांच्या अनेक हिट असलेल्या गाण्यांपैकी ‘लायसन्स’ हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं.
-
गाण्याप्रमाणेच मूसेवाला बंदूक आणि महागड्या गाड्यांचे शौकीन होते.
-
त्यांच्या गाण्यातील बंदूकीच्या दृश्यांमुळे त्यांच्यावर हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
-
याशिवाय त्यांचे एके-४७ रायफलने गोळीबार करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.
-
मूसेवाला यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
-
पंजाब काँग्रेसचे प्रमुख असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी मूसेवालांना तरुण पिढीचे नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणून संबोधले होते.
-
काँग्रेसचे नेते आणि अनेकदा चर्चेत आलेले मूसेवाला शानदार आयुष्य जगायचे.
-
कॅनडामध्ये त्यांचं आलिशान घर आहे.
-
तसंच, त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शनदेखील होते.
-
मीडिया रिपोर्टनुसार, मूसेवाला यांच्याकडे टोयोटो फॉर्च्यूनर, जीपसारख्या आलिशान गाड्या होत्या.
-
याशिवाय रेंज रोवर, मर्सिडिज या महागड्या गाड्यांमधून ते फिरायचे.
-
सिद्धू मूसेवाला यांच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी चाहते गर्दी करायचे.
-
एका कॉन्सर्टसाठी मूसेवाला २० लाख रुपये मानधन घ्यायचे.
-
तर एका गाण्यासाठी ते ६ ते ८ लाख रुपये मानधन घ्यायचे, अशी माहिती आहे.
-
रिपोर्टनुसार, मुसेवाला एका महिन्याला जवळपास ३५-४० लाख रुपये कमवायचे.
-
जूनमध्ये मुसेवला वर्ल्ड टूर ट्रिपसाठी जाणार होते.
-
परंतु, त्या आधीच त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली.
-
(सर्व फोटो : सिद्धू मूसेवाला/ इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”