-
पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
-
मानसाच्या जवाहरके गावाजवळ मुसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
-
या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
-
या घटनेमुळे पंजाबसह संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
सिद्धू मुसेवाला हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायचा.
-
तो नेहमी त्याच्या गाण्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असायचा.
-
सिद्धू मुसेवालाचा सोशल मीडियावर फार मोठा चाहता वर्ग आहे.
-
सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आईच्या फार जवळ होता.
-
तो अनेकदा आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा.
-
काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवाला यांची आई चरण कौर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
या वाढदिवसानिमित्त सिद्धूने त्याच्या आईला खास शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या.
-
यात सिद्धू मुसेवाला यांनी त्यांच्या आईला समर्पित करणारे एक गाणे गायले आहे. ‘डियर मम्मा’ असे त्या गाण्याचे नाव होते.
-
या गाण्यातून सिद्धू यांचे त्यांच्या आईवर असलेले प्रेम स्पष्टपणे जाणवते.
-
आई चरण कौरच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक फोटोही पोस्ट केला होता.
-
“कधीकधी मी सूर्यासारखा तापट असतो, तर कधी मी पहाटेसारखा शांत असतो. पण आई मला वाटते की मी तुझ्यासारखा आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते.
-
या आधीही सिद्धूने एक फोटो शेअर आईसाठी खास पोस्ट लिहिली होती.
-
“कधी वीज चमकते तर कधी अंधार, पण मला वाटते की मी तुझ्यासारखा आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.” असे त्याने म्हटले होते.
-
मुसेवाला यांनी २० फेब्रुवारी मानसामधून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..