-
अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जूनला प्रदर्शित होत आहे. अलीकडेच अक्षय कुमारने खुलासा केला होता की त्याने या चित्रपटात 6 किलोचा पोशाख घातला होता, ज्यामध्ये शूट करणे खूप कठीण होते. यापूर्वी ‘केसरी’ चित्रपटासाठी अक्षयने ६ किलो वजनाची पगडी घातली होती. मात्र, अक्षय कुमारच्या आधीही असे अनेक स्टार्स आले आहेत ज्यांनी जड पोशाख परिधान करून चित्रपटाचे शूटिंग केले आहे. चला एक नझर टाकूया –
-
‘क्रिश 3’ चित्रपटात विवेक ओबेरॉयने खलनायकाची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेसाठी विवेकने परिधान केलेल्या पोशाखाचे वजन २८ किलो होते.
-
अमिताभ बच्चन यांनी ‘शहेनशाह’ चित्रपटासाठी १८ किलोचा ड्रेस परिधान केला होता. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं हा या चित्रपटाचा प्रसिद्ध संवाद आहे.
-
दीपिका पदुकोणने ३० किलो वजनाचा लेहेंगा परिधान केला आणि ‘पद्मावत’ चित्रपटातील घूमर या गाण्यासाठी डान्स केला.
-
‘जोधा अकबर’साठी ऐश्वर्या राय बच्चनने परिधान केलेल्या लेहेंग्याचे वजन २२ किलो होते.
-
‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात अनुष्का शर्माने १७ किलो वजनाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
माधुरी दीक्षितने ‘देवदास’ चित्रपटातील ‘काहे छेडा’ गाण्यात ३० किलोचा लेहेंगा परिधान करून परफॉर्मन्स दिला होता. (all photos: indian express)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’