-
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन आज (९ जून) विवाहबंधनात अडकले.
-
महाबलीपुरम येथील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नयनतारा-विग्नेशचा लग्नसोहळा पार पडला.
-
लग्नासाठी नयनताराने लाल रंगाची साडी परिधान केली होती.
-
विग्नेश शिवनने लुंगी आणि शर्ट असा पारंपारिक वेश केला होता.
-
पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने नयनतारा-विग्नेश यांचा विवाहसोहळा पार पडला.
-
नयनतारा-विग्नेश यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण.
-
या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली होती.
-
नयनतारा-विग्नेश गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
-
सार्वजनिक कार्यक्रमांत ते अनेकदा एकत्र दिसले होते.
-
नयनतारा-विग्नेश यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट बघत होते.
-
विवाहसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो नयनताराने सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.
-
नयनतारा-विग्नेशच्या या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : नयनतारा, विघ्नेश शिवन/ इन्स्टाग्राम)

धावत्या गाडीत जातीयवाद चिघळला! ठाण्याच्या महिलेवर हल्ला, विवस्त्र करण्याचा प्रयत्न