-
लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचली.
-
या शोमध्ये नम्रता विविध विनोदी पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवते.
-
विनोदवीर अशी ओळख असलेल्या नम्रताने नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
नम्रताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.
-
अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी नम्रता कायमच चर्चेत असते.
-
नुकतंच नम्रताने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
-
नम्रताने शेअर केलेल्या या पोस्टच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
नम्रताने लाडक्या लेकासाठी खास पोस्ट लिहली आहे.
-
नम्रताच्या मुलाचं नाव रुद्राज असं आहे.
-
ती म्हणते “मी जेव्हा शूटिंगला जायचे तेव्हा बाळाला वेळ देता येत नसल्यामुळे मला फार अपराधी वाटायचे. तो मला जीव लावेल ना? सतत आई-आई म्हणत माझ्या अवतीभोवती फिरेल ना? असं वाटायचं. “
-
“एकदा तर आई तू नको मला भरवू आजी भरवेल असं त्याने म्हटल्यावर मी ढसाढसा रडले होते. तेव्हा योगेशने समजावलं. तो लहान आहे. पाचव्या मिनिटाला जवळ घेईल आणि अगदी तसं व्हायचं.”
-
“आता काही एक महिने लोटल्यावर मला आई पाहिजे, आई मला भेट ना…असं तो म्हणतो तेव्हा माझं काय होतं, हे शब्दात मांडता येणार नाही. खूप भारी वाटतं. अजूनही विश्वास बसत नाही की जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट माझ्याकडे आहे. माझं लेकरू.”, असं कॅप्शन नम्रताने पोस्टला दिलं आहे.
-
नम्रताची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
-
नम्रताने मुलगा रुद्राजसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
-
नम्रता आणि मुलगा रुद्राजचा खास फोटो.
-
नम्रता पती योगेश आणि मुलगा रुद्राजसोबत.
-
याआधी नम्रताने तिच्या प्रेग्नन्सीदरम्यानचा अनुभव मुलाखतीदरम्यान सांगितला होता.
-
नम्रता आणि तिचा लाडका लेक.
-
नम्रताने पती योगेश संभेरावसोबत २०१३ साली लग्नगाठ बांधली.
-
नम्रताचा पती आणि मुलासोबतचा गोड फोटो.
-
(सर्व फोटो : नम्रता संभेराव/ इन्स्टाग्राम)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…