-
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत ‘शमशेरा’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
-
चित्रपटातील कलाकारांचा लूकही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
-
‘शमशेरा’ २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगु अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘शमशेरा’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
-
या चित्रपटात रणबीर ‘शमशेरा’ या भूमिकेत दिसणार आहे.
-
चित्रपटातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चर्चेत होता.
-
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
‘शुध सिंग’ ही भूमिका तो साकारणार आहे.
-
चित्रपटातील संजय दत्तचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला.
-
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.
-
‘सोना’ हे पात्र वाणी साकारणार आहे.
-
अभिनेता रौनित रॉय चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
कलाकारांच्या लूकप्रमाणेच त्यांनी घेतलेल्या मानधनाचीही बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
शमशेरासाठी संजय दत्तने आठ कोटी रुपये मानधन घेतले असल्याची माहिती आहे.
-
तर अभिनेता रौनित रॉयने ‘शमशेरा’ चित्रपटासाठी चार कोटी मानधन घेतले आहे.
-
मिडिया रिपोर्टनुसार, शमशेरा साकारण्यासाठी रणबीरने तब्बल २० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, यश राज फिल्म्स/ इन्स्टाग्राम)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…