-
‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. गेल्या चार वर्षापासून श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत ती छान सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
-
यात तिच्यासोबत अभिनेत्री अभिज्ञा भावे, रेश्मा शिंदे, अनुजा साठे हे देखील पाहायला मिळत आहे.
-
विशेष म्हणजे यातील एका फोटोत अभिज्ञा भावेचा पतीही दिसत आहे.
-
सिनेसृष्टीतील हे कलाकार एखाद्या रिसॉर्टवर फिरायला गेल्याचे दिसत आहे.
-
या फोटोंना श्रेया बुगडेने हटके कॅप्शन दिले आहे.
-
“…म्हणून मला मुक्काम करणे आवडते”, असे श्रेया बुगडेने ही पोस्ट करताना म्हटले आहे.
-
तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच त्यावर अनेक कलाकारांनी ‘मस्तच’, ‘छान’ अशा कमेंटही केल्या आहेत.

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल