-
बॉलिवूडमध्ये काही स्टार्स असे आहेत ज्यांनी लग्नानंतर काही महिन्यातच बाळाच्या आगमनाची (Bollywood Actress Pregnancy) बातमी दिली. दुसरीकडे असेही स्टार्स आहेत ज्यांनी लग्नाला अनेक वर्षे होऊनही अद्याप पालक होण्याचा निर्णय घेतलेला नाही.
-
यात रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोनचाही (Deepika Padukone) समावेश आहे. दोघांनीही २०१८ मध्ये लग्न केलंय. (Photo: Deepika Padukone Instagram)
-
बॉलिवूडचा अॅक्शन हीरो जॉन अब्राहमने जवळपास ९ वर्षांपूर्वी प्रिया रूंचालशी लग्न केलं. त्या दोघांनीही अद्याप आई-बाबा होण्याचा निर्णय घेतलेला नाही. (Photo: John Abraham Instagram)
-
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर व अभिनेत्री शबाना आजमी यांनी १९८४ मध्ये लग्न केलं. मात्र, लग्नानंतर त्या दोघांनी पालक न होण्याचा निर्णय घेतला. हे जावेद अख्तर यांचं दुसरं लग्न आहे. (Photo: Shabana Azmi Instagram)
-
पहिल्या बायकोशी लग्नानंतर त्यांना मुलगा फरहान अख्तर आणि मुलगी जोया अख्तर ही दोन अपत्ये आहेत. (Photo: Indian Express)
-
विद्या बालन व सिद्धार्थ रॉय कपूर या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, त्यांनीही अद्याप आई-बाबा होण्याचा निर्णय घेतलेला नाही. (Photo: Vidya Balan Instagram)
-
बिपाशा बसू व करण सिंह ग्रोवर यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. या जोडीने देखील अद्याप बाळाचा निर्णय घेतला नाही. (Photo: Karan Singh Grover Instagram)
-
राधिका आपटेने २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं होतं. त्यांनाही मूल नाही.
-
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने २०१६ मध्ये बॉयफ्रेंड मोहसिन अख्तरसोबत लग्न केलं होतं. त्यांनीही अद्याप पालक होण्याचा निर्णय घेतला नाही. (Photo: Urmila Matondkar Instagram)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल