-
अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली.
-
आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे.
-
बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी गुरुवारी (१४ जुलै) संध्याकाळी एक ट्वीट करत सुष्मिता सेनला डेट करत असल्याची कबुली दिली.
-
पण याआधी सुष्मिताचं नाव अनेक व्यक्तींशी जोडलं गेलं.
-
‘दस्तक’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक विक्रम भट यांच्याबरोबर सुष्मिताची जवळीक वाढली. पण विक्रम विवाहित असल्याने या दोघांचं रिलेशन जास्त काळ टिकलं नाही.
-
पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमशी सुष्मिताचं नाव जोडलं गेलं. पण सुष्मिताची लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस दुनियेतील तिला वावर वसीम यांना पटला नाही. त्यामुळेच सुष्मिता-वसीमच्या नात्याचा दि एण्ड झाला.
-
अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर सुष्मिताचं असलेलं रिलेशन तर खूप गाजलं. ‘कर्मा और होली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं नातं जुळलं. जवळपास ३ वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं.
-
सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती. दोघांचे बरेच एकत्रित फोटो व्हायरल झाले. पण रितिक-सुष्मिताचं ब्रेकअप झालं.
-
सुष्मिताचा मॅनेजर बंटी सचदेवा याच्याबरोबरही सुष्मिताचं रिलेशनशिप असल्याची चर्चा होती. पण सुष्मिताचं बंटी सचदेवाबरोबरही पटलं नाही.
-
रोहमन शॉल आणि सुष्मिताच्या रिलेशनशिपला २०१८मध्ये सुरुवात झाली. रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. २०२१मध्ये रोहमनशी ब्रेकअप झाल्याचं सुष्मिताने सोशल मीडियाद्वारे जाहिर केलं.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडली! खऱ्या आयुष्यात लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई, शेअर केली पोस्ट