-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आघाडीच्या कलाकारांनी अभिनयासोबतच व्यवसायातही नाव कमवलं आहे. यात अभिनेत्रीही मागे नाहीत.
-
आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या सर्वच दाक्षिणात्य अभिनेत्री काही ना काही व्यवसाय करताना दिसतात. विशेष म्हणजे या क्षेत्रात त्या यशस्वी देखील आहेत.
-
अभिनेत्री नयनतारा एका प्रॉडक्शन हाऊसची मालकीण आहे. तिचं ‘राउडी पिक्चर्स प्रॉडक्शन कंपनी’ नावाचं प्रॉडक्शन हाऊस आहे.
-
याशिवाय नयनताराने इतर काही ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली आहे.
-
तिने ‘चाय वाला’, ‘द लिप बाम’ आणि सौदी अरबच्या एका तेल कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.
-
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने बरीच हिट चित्रपट दिले आहे. पण अभिनयाव्यतिरिक्त ती व्यवसाय क्षेत्रातही आहे.
-
चित्रपटांव्यतिरिक्त सामंथा रुथ प्रभू ‘साकी’ या कपड्यांच्या ब्रँडची फाउंडर आहे.
-
अभिनेत्री काजल अग्रवाल ‘मरसाला’ नामक ज्वेलरी ब्रँडची मालकीण आहे.
-
या व्यवसायात काजलची बहीण निशा अग्रवाल तिची पार्टनर आहे.
-
अभिनेता कमल हसन यांची मुलगी श्रुती हासन दाक्षिणात्य अभिनयसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण यासोबत ती एक बिझनेसवूमनही आहे.
-
अभिनेत्री श्रुती कमल हासन Isidro नावाची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी चालवते.
-
अभिनेत्री राकुलप्रीत सिंहने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडवरही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
-
राकुलप्रीत सिंह जिम बिझनेसमध्ये आहे. तिच्या हैदराबाद आणि विशाखापट्टनम येथे ३ जिम आहेत.
-
‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण एक यशस्वी बिझनेसवूमनही आहे.
-
तमन्ना भाटियाचा ‘व्हाइट अँड गोल्ड’ नावाचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आहे. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ