-
अभिनेत्री श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. कायम वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारत श्रेयाने तिच्या विनोदी शैलीने चाहत्यांची मोठी पसंती मिळवलीय.
-
सोशल मीडियावरही श्रेया चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसते. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांच्या भेटीचे खास क्षण ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करत असते.
-
सध्या श्रेया गोव्यामध्ये एन्ज़ॉय करताना दिसतेय. गोवा ट्रीपचे फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गोव्यात समुद्र किनाऱ्यावर ती निवांत क्षण घालवताना दिसतेय.
-
निसर्गाच्या छटांचा मनमुराद आनंद घेत असतानाच श्रेयाने खमंग मेजवानीची मजा लुटली आहे.
-
श्रेयातील मेजवानीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यात तिने मासाहारी थाळीचा स्वाद अनुभवल्याचं दिसतंय. यात मासे फ्राय, फिश करी, भात आणि वेगवेगळे खमंद पदार्थ दिसत आहेत. श्रेयाने शेअऱ केलेले फोटो पाहून कुणीही मांसाहारी प्रेमी व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटेल.
-
श्रेयाने शेअर केलेला फोटो पाहून कदाचित अभिनेता स्वप्निल जोशीच्या तोंडालाही पाणी सुटलं असं म्हणावं लागेल. कारण स्वप्निलने श्रेयाच्या फोटोवर एक कमेंट केली आहे. “तू गोव्य़ात असेपर्यंत मी तुला ब्लॉक करत आहे. जेवणाचे हे फोटो आता मी अजून पाहू शकत नाही”
-
तर श्रेयाने आणखी एक लज्जतदार थाळीचा फोटो शेअर करत स्वप्निलला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. हा फोटो तिने इन्स्टास्टोरीला शेअर केलाय
-
. “स्वप्निल जोशी मला ब्लॉक करणार नाही अशी अपेक्षा करते.” असं तीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. (All Photo-Instagram@shreyabugde)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल